Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
इमेजवर क्लिक करा

Tuesday, November 23, 2021

सोपे वाक्य वाचन सरावआजोबा फिरायला जातात. 

रोज ते पेपर वाचतात.

 आजोबा माझा अभ्यास घेतात.

 रात्री मला गोष्ट सांगतात.


डॉक्टर दवाखान्यात असतात. 

ते आजारी लोकांना तपासतात.

 तपासून ते त्यांना औषध देतात.

 गरज पडल्यास इंजक्शन देतात.


गणू मातीची भांडी करतो. 

मातीचा गोळा चाकावर ठेवतो. 

चाक फिरवून आकार देतो.

 भट्टीत भाजून पक्के करतो.


तुकाराम टेबल-खुर्ची बनवितो. 

करवतीने लाकूड कराकर कापतो. 

रंधा मारून गुळगुळीत करतो. 

पॉलिशने चकचकीत करतो.


माझी आजी नागपूरला रहाते. 

तिची संत्र्याची बाग आहे. 

पत्र पाठवून मला लिहिते. आमच्या नागपूरला येऊन रहा बाप्पा.


मी घराचे रक्षण करतो.

कोणी नसताना देखरेख करतो चावीशिवाय मी उघडत नाही. 

मी कोण? मी कोण ?


चिंच फार आंबट असते. 

हिरव्या चिंचा छान लागतात. 

जेवणात चवीला चिंच वापरतात. चिंचोके भाजून खातात.


परातीत पीठ मळले. 

पोळपाटावर चपाती लाटली.

 तव्यावर चपाती भाजली.

 गरम चपाती ताटात वाढली.


आमच्याकडे एक किसणी आहे. तिच्यावर बारीक किसले जाते. 

खोबरे किसून चटणी करतो. 

गाजरे किसून हलवा करतो.


आगगाडीला इंजिन असते.

 आगगाडी विजेवर पण चालते. 

गाडीला खूप डबे असतात.

 गाडीतून खूप माणसे जातात.


बसमध्ये कंडक्टरकाका असतात. 

ते आपल्याला तिकीट देतात. 

स्टॉप आला की घंटी वाजवतात. 

मग ड्रायव्हरकाका बस थांबवतात.


मेंढीच्या अंगावर लोकर असते. लोकरीपासून धागा काढतात.

 त्या धाग्याचे स्वेटर विणतात.

 स्वेटर थंडीत वापरतात.


मगर पाण्यात व जमिनीवर आढळते. 

ती पाण्यात पोहू शकते.

 जमिनीवर चालू शकते. 

ती उन्हात बसून अंग शेकते.


पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात.

 कावळा काटक्यांचे घरटे बांधतो. सुगरण गवताचे घरटे विणते. 

शिंपी पानांचे घरटे शिवतो.


खंड्या पक्षी मासे खातो. 

तो पाण्याजवळ राहतो. 

तो नदीकाठी बीळ खणतो. 

बिळात त्याचे घरटे असते.


मला वडापाव आवडतो. 

वडा तिखट व गरम हवा. 

पावावर लसणीची चटणी हवी. 

मग मी चार वडापाव खाईन.


वडाचे झाड मोठे असते. 

वडाला पारंब्या फुटतात.

 त्या जमिनीत जाऊन रुजतात. 

पक्षी वडाची फळे खातात.


पिंपळाची पाने सुंदर दिसतात.

 कोवळी पाने लालसर असतात. 

पिकली की ती पिवळी होतात. वाळल्यावर त्यांना जाळी पडते.


माडाला झावळ्या असतात.

 झावळ्यांना पाती असतात.

 पात्यातील शिरेला हीर म्हणतात. हिरांच्या केरसुण्या करतात.


नारळाची चटणी करतात.

 नारळाच्या करंज्या करतात. 

नारळ मसाल्यात घालतात.

 सत्काराला नारळ देतात.


पळसाच्या पानांचे द्रोण करतात. 

त्यांच्या पत्रावळीही करतात. 

पळसाची फुले फुलांपासून लाल असतात. 

लाल रंग मिळतो.


जांभळाचे झाड उंच असते. 

त्याचे खोड पांढरट असते.

 जांभळे जांभळी असतात. 

जांभळात मोठी बी असते.


फणसाला वरून काटे असतात. फणसाचे गरे गोड लागतात. 

गऱ्यात आठळी असते.

 फणस खोडावर लागतात.


कच्चा आंबा म्हणजे कैरी. 

कैरीचे लोणचे करतात. 

कैरी पिकली की पिवळी होते. 

पिकलेल्या आंब्याचा रस करतात.


बाळ बघा बाळ. 

आई, दाखव मला बाळ. 

हात मऊ, पाय मऊ. 

नाक लहान, कान लहान.


मामाची गाडी आली. 

मामा आला, मामी आली. 

छबी आली, बेबी आली. 

फार फार मजा आली.


शाळेला मोठे मैदान आहे.

 सकाळी मैदानात प्रार्थना होते.

 दुपारी आम्ही तिथे खेळतो. 

मैदानात खेळताना धमाल येते.


आमच्या बाई छान शिकवतात. निबंधाच्या वह्या तपासून देतात.

 गणित नीट समजावून सांगतात. 

छान छान गोष्टी सांगतात.


खाली ऐरण त्यावर लोखंड 

वरून मारतो घण दणादण 

रामू घडवतो सुरे-कोयते 

नांगराचा फाळ, फावडी, खुरपे.


सखाराम बांगड्या घेऊन येतो.

 रेशमी बांगड्या, वर्खी बांगड्या.

 लाल, हिरव्या, सोनेरी बांगड्या. 

तो बांगड्या भरून देतो.


मनीष दागिने घडवितो.

 बांगड्या, साखळ्या, अंगठ्या. 

सोने खूप महाग असते. 

पाडव्याला सोने खरेदी करतात.

*


No comments:

Post a Comment